येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. एस. बी. मुळे या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील बी.एड. (२०२५-२०२६) च्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी सरदार पटेल यांचे अखंड भारताच्या जडणघडणीतील योगदान आणि इंदिरा गांधी यांचे कार्य यावर प्रकाश टाकला. प्राचार्या डॉ. एस. बी. मुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि बी.एड. चे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महापुरुषांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.



